– टी.पी. मुंडेंच्या घणाघाती भाषणाने वातावरण तापले; ‘कोण आला रे कोण आला, जरांगेचा ** आला’; दिली घोषणा!
इंदापूर, जि.पुणे (विशेष प्रतिनिधी) – एकीकडे २४ डिसेंबर संपले की सरकारला पाहून घेऊ, भुजबळांना पाहून घेऊ, अशी धमकी मनोज जरांगे देतोय. राज्यात काय कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल करत सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला अर्थात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला. इंदापूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. असे कोणीही येऊन धमक्या देत असेल तर तुम्हा- आम्हाला अन् सरकारलादेखील गप्प राहता येणार नाही, राज्यात असे अजिबात चालणार नाही, अधिकार्यांना देखील तटस्थपणे भूमिका घेऊन कामं करावे लागतील, असेही भुजबळांनी ठणकावून सांगितले. ‘जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं, असे खुले चॅलेंजदेखील याप्रसंगी भुजबळ यांनी दिले. तर याप्रसंगी ‘कोण आला रे कोण आला जरांगेचा ** आला’, अशी घोषणा ओबीसी नेते टी. पी. मुंडे यांनी दिल्याने राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंदापुरात मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी आलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. चपलाही भिरकावल्या. पोलिसांनी सावधानता बाळगून पडळकरांना सुरक्षित केलं. #GopichandPadalkar #MarathaReservation pic.twitter.com/2CASfkfBAX
— Abhijit Karande (@AbhijitKaran25) December 9, 2023
सारथीमार्फत अनेक निधी दिला. एवढ सगळे करून आमची ते पात्रता काढतात, असा टोलाही भुजबळ यांनी हाणला. या सभेदरम्यान भुजबळांनी जरांगे यांच्या व्हिडिओ क्लिप ऐकवत त्यांच्या हिंदीची खिल्ली उडवली. त्यांना हिंदी बोलता येत नाही. जरांगे हे अक्कलेने दिव्यांग झाले आहेत. महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे प्रशासन एक नंबर आहे. अधिकार्यांनी तसे काम केले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.
दादागिरीला उत्तर दादागिरीनेच देऊ – भुजबळांचा जरांगेंना इशारा
अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिला. तसेच राज्यात सगळे कुणबी होतील, एकही मराठा शिल्लक राहणार नाही, याचा पुनरुच्चार करत, हर्षवर्धन पाटील तुम्ही कुणबी सर्टिफिकिट घेणार का? मोहिते पाटील तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेणार का? असा सवालही भुजबळांनी केला. सध्या २७ टक्के आरक्षण आहे. पण नोकर्या ९.५ टक्के इतक्या आहेत. आधी आमचे २७ टक्के आरक्षण पूर्ण भरा, अशी मागणी भुजबळ यांनी केली. आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अशी आमची भूमिका असल्याचे भुजबळ यांनी याप्रसंगी सरकारला ठणकावले.
————–
————–
छगन भुजबळांनी जाहीर सभेतून केली मनोज जरांगेंच्या हिंदीची मिमिक्री#ChhaganBhujbal #ManojJarangePatil pic.twitter.com/kNK7EEaggD
— News18Lokmat (@News18lokmat) December 9, 2023

