पंजाब सरकारने शहीद अग्निवीरांच्या कुटुंबीयांना एक कोटी दिले; राज्य सरकारने फक्त 10 लाख!

Contents
– राज्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टवार यांनी शहीद अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटुंबियांचे केले सांत्वनचिखली (तालुका प्रतिनिधी) – देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या अग्निवीर शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने केवळ १० लक्ष रूपयाची तुटपुंजी मदत देवून एकप्रकारे शहीदाच्या कुटुंबीयांचा अवमान केला असल्याची प्रतिक्रीया राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या पिंपळगांव सराई येथील घरी जावून कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वन केले. पंजाब सरकारने शहीद अग्निवीराला १ कोटी रूपये देवुन मदत केली, त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुध्दा शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी, याकरीता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सागितले. यावेळी बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, श्यामभाऊ उमाळकर, संजय राठोड, अॅड. जयश्रीताई शेळके, जिल्हा सैनिक बोर्डाचे उबरहंडे यांची उपस्थिती होती.
