राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विष्णूभगवान गाढे यांची नेत्रदीपक कामगिरी

editor 1 Min Read
1 Min Read
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – नाशिक येथील स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे १७ व १८ नोव्हेंबररोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयातील अंतर्गत लेखा परीक्षण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी विष्णूभगवान गाढे यांनी नेत्रदीपक कामगिरी करत, राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावत, दोन रौप्यपदकांची कमाई केली.

नाशिक येथे पार पडलेल्या या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्यात. विष्णूभगवान गाढे यांनी ४०० मीटर प्रâीस्टाईल पोहणे या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकावले. तसेच, २०० मीटर आयएम या प्रकारातही द्वितीय क्रमांक पटकावून आणखी एक रौप्यपदक आपल्या खात्यात जमा केले. विष्णूभगवान गाढे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदकांची कमाई केल्याने महसूल व वित्त विभागाचे नाव राज्यस्तरावर उंचावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

https://breakingmaharashtra.in/buldhana_elgar_morcha-4/

Share This Article
Exit mobile version