अलंकापुरीत इंद्रायणी नदी घाटावर छठपूजा परंपरेने साजरी

editor 3 Min Read
3 Min Read
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पवित्र इंद्रायणी नदी घाटावर उत्तर भारतीय नागरिकांनी महाछठ पर्व परंपरागत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा हजारो उत्तर भारतीय नागरिक, भाविकांनी मोठी गर्दी करून व्रत जोपासले. इंद्रायणी महाआरती सेवा समितीचे वतीने भोलापुरी महाराज यांचे मार्गदर्शनात पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास महाराज बालवडकर, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, इंद्रायणी महाआरती सेवा समितीचे प्रमुख अर्जुन मेदनकर, सागर महाराज लाहुडकर, माऊली घुंडरे, नितीन ननवरे, दिनकर तांबे, रोहिदास कदम,सचिन महाराज शिंदे, दिनेश कुऱ्हाडे, साईनाथ ताम्हाणे यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते इंद्रायणीची आरती व पूजा करण्यात आली. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक रामदास भोसले, सागर बोरुंदीया, अशोक कांबळे, उद्योजक अनिल लोखंडे, प्रकाश कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समिती आळंदीचे संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, सुधीरकुमार शर्मा, कृष्ण एस.भारद्वाज, राकेशकुमार महतो, विनोदकुमार मिश्रा, अरविंद सिंग आदी उपस्थित होते.
छठ पूजा मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रद्धेने ३ दिवस अनेकांनी निर्जल उपवासासह केली. या पूजेत मावळत्या सूर्य देवाला व सकाळी उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य (नमन) करून करण्यात आली . यावेळी छठ वृत्तीचे स्वागत, दीप प्रज्वलन, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्या अर्घ्य, कार्तिकी अन्नदान, प्रात: अर्घ्य, महाप्रसाद वितरण करण्यात आले. या पूजेतून सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याची भावना आहे. या छठ पूजा महापर्वाचे आयोजन जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समितीच्या वतीने उद्योजक सुधीरकुमार शर्मा, संयोजक अन्नू कृष्णा भारद्वाज, कृष्णा एस.भारद्वाज, विनोदकुमार मिश्रा, राकेशकुमार महतो यांनी केले. यावेळी आळंदी व दिघी पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. इंद्रायणी नदीघाटावर यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. छठ पूजा महापर्वाचे जगतगुरू शंकराचार्य समितीचे वतीने उत्साहात आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सुधीरकुमार शर्मा यांनी सांगितले. तसेच विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर ‘भव्य काशी गंगा आरती’चे आयोजन करण्यात आले होते. भक्ती भावपूर्ण वातावरणात इंद्रायणी मातेची यावेळी काशी येथून आलेल्या पौरोहित्यांनी विधिवत आरती केली. राष्ट्रीय एकतेतून राष्ट्र विकास हे ध्येय ठेवून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमासह विश्व श्रीराम सेना ही संस्था छठ महापुजा निमित्त भव्य गंगा आरतीचे आयोजन करीत असते. या महोत्सवाची सांगता सोमवारी पहाटे पाच वाजता सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्ध्य देऊन होते. सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, भव्य गंगा आरती सह विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सूर्याची उपासना करण्यासाठी छटपूजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्‍या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. अशी माहिती सुधीरकुमार शर्मा यांनी दिली.

Share This Article
Exit mobile version