किन्ही रोडवर इनोव्हा गाडीला भीषण अपघात, एक ठार

editor 1 Min Read
1 Min Read
लोणार (उद्धव आटोळे) – जगप्रसिद्ध लोणार सरोवरला लागून असलेल्या किन्ही गावाजवळील वळण रस्त्यावर इनोव्हा गाडी (क्रमांक एमएच ०१, एएक्स ९८९८)च्या चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी काठाखाली जाऊन पलटी झाली. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जालना येथे हलविण्यात आले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आज (दि. १८) सायंकाळच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

लोणार सरोवरानजीक असलेल्या किन्ही गावाजवळ वळण रस्ता आहे. या वळण रस्त्यावर इनोव्हा क्रमांक एम.एच. ०१ ए.एक्स. ९८९८ भरधाव जात असताना चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटून भरधाव गाडी रस्त्याच्या काठावर खाली पलटी झाली. ज्यामध्ये गाडीतील सूरज शिवाजी गुडवे रा. ठाणे, जिल्हा ठाणे (वय २५) हा जागीच ठार झाला. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस स्टेशनला घटनाची माहिती मिळताच पोलीस निरक्षक निमिश मेहेत्रे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे, पो. जमदार बन्सी पवार, पो. जमदार संतोष चव्हाण, पो. लेखनिक गणेश लोंढे, पो. बोरे, पो. निकस, पो. भोकरे, ट्रॉफिक पो. गजानन शेजुळ, ट्रॉफिक पो. गीते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. अधिक तपास लोणार पोलिस करत आहेत.
—————

Share This Article
Exit mobile version