‘सहारा’चे सुब्रतो रॉय यांचे निधन

editor 1 Min Read
1 Min Read
मुंबई (प्रतिनिधी) – सहारा उद्योग समुहाचे संचालक सुब्रतो रॉय यांचे काल रात्री मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. सहारा समुहाची स्थापना करुन रॉय यांनी वित्त, बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतुक, प्रसारमाध्यमे, आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये विविध उद्योगांची स्थापना केली.

सहारा समूह ११ वर्षे भारतीय क्रिकेट संघाचा पुरस्कर्ता होता. मात्र कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात सेबी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुब्रतो रॉय यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर रूग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.
———-

Share This Article
Exit mobile version