खासदारांच्या दबावापुढे उद्धव ठाकरे झुकले; राष्ट्रपती निवडणुकीत ‘एनडीए’ला पाठिंबा!

editor 1 Min Read
1 Min Read

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – आपल्याच खासदारांनी निर्माण केलेल्या दबावापुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे झुकत असल्याचे दिसून येत आहे. अनुसूचित जातीची महिला राष्ट्रपती होत असल्याचा आपल्याला आनंद असून, त्यामुळेच आपण राष्ट्रपती निवडणुकीत द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेत आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. ठाकरे यांची ही भूमिका महाविकास आघाडीसाठी झटका मानली जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी कालच मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत बहुतांश खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे, महाविकास आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा न देता, उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांसोबत जाणे पसंत केले आहे.
———–

Share This Article
Exit mobile version