बुलढाणा (संजय निकाळजे) – माजी सैनिकांची बिना परिश्रम यश कहा या सैनिकी संघटनेचा वर्धापनदिन रविवार, १ ऑक्टोबर २०२३ रोजी चिखली येथील राजवाडा रिसॉर्ट मेहकर फाटा चिखली येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुभेदार मेजर सुरेश तेलंग, उद्घाटक मेजर यादव म्हस्के, कॅप्टन वालचंद परमेशोर, कॅ.रामदास लहाने, रमेश अवसरमोल, भिमराव वानखेडे, गुलाब पानझडे, अशोक पवार, विजय जाधव, ज्ञानेश्वर ठेंग, केशव सोनुने, नंदु ढाकरके, गौतम सावळे, संजय खंडारे, शेषराव चव्हान, काशिनाथ इंगळे, दत्ता गवई, सतिश पवार आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करून झाली. चिखली तालुकयातील शहीद स्मारकपर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली. सन १९६२, १९६५, १९७१, १९९९ च्या युद्धात ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदविला असे वीर जवान, शहीद वीर पत्नी, वीर माता यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मेजर लक्ष्मण साळवे यांनी केले. आभार प्रदर्शन मेजर रमेश साळवे यांनी केले. यशस्वीतेसाठी राजु वानखेडे, गणेश जाधव, प्रकाश मिसळकर, पंडित जाधव, राहुल जाधव, जय शिरसाठ, सुनिल साबळे, रमेश ओव्हाळे, अर्जून साबळे, सीताराम मोरे, अशोक बोरकर, विठ्ठल गवई आदींनी परिश्रम घेतले.

