शहादा शहरातील नवीन वसाहती, सखल भागात पाणी साचले

editor 1 Min Read
1 Min Read

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – शहादा तालुक्यात गेल्या २४ तासापासून पावसाची सततधार सुरू असून, शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली आहे.  या परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अनेक नवीन वसाहती मध्ये पाणी जमा होत असल्याने रहिवाश्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यात गेल्या २४ तासात ६५ मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही भागात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे .

Share This Article
Exit mobile version