काँग्रेसच्या ‘जनसंवाद यात्रे’चा आज जिजाऊ मॉसाहेबांना वंदन करून शुभारंभ!

editor 2 Min Read
2 Min Read

– चिखलीत संध्याकाळी ‘लोकशाहीच्या रक्षणासाठी जनसंवाद दहिहंड़ी’ कार्यक्रम

सिंदखेडराजा/बुलढाणा (बाळू वानखेडे) – काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा आज (दि.६) सकाळी दहा वाजता सिंदखेड़राजा येथून मॉसाहेब जिजाऊ यांना वंदन करून शुभारंभ होणार आहे. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड़ेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संध्याकाळी चिखली येथे लोकशाहीच्या रक्षणासाठी जनसंवाद दहिहंड़ी कार्यक्रम या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सकाळी ११ वाजता देऊळगावराजा तालुक्यातील सिनगाव फाटा येथील योगीराज लॉन्स येथे जाहीर सभा होणार आहे. दुपारी ४ वाजता अंढेरा फाटा येथे जनतेशी संवाद साधला जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता सदर जनसंवाद यात्रा बुलढाणा येथे पोहोचणार असून, येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता येथे जनतेशी संवाद साधणार असून, आ. धीरज लिंगाड़े यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सदर जनसंवाद यात्रा चिखलीत पोहोचणार असून, येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रतिष्ठानच्यावतीने लोकशाहीच्या रक्षणासाठी जनसंवाद दहिहंड़ी कार्यक्रम या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी सकाळी 9.30 वाजता विरोधी पक्षनेते विजय वड़ेट्टीवार मेहकर येथील सत्यजीत काॅलेजला भेट देणार असून, शाम उमाळकर यांनी त्यांचा सत्कार आयोजित केला आहे. तरी उपस्थित राहण्याचे आवाहन सरचिटणीस कलीमखान यांनी केले आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या जनसंवाद यात्रेत आजी, माजी आमदार, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, जेष्ठ कार्यकर्ते सहभागी असणार आहेत. तरी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेस जणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस सतिष मेहेंद्रे यांनी केले आहे, असे जिल्हा काँग्रेसचे सोशल मीडियाप्रमुख श्लोकांनद ड़ांगे यांनी कळविले आहे.

Share This Article
Exit mobile version