पाचोडमध्ये जमिनीवर विद्युत प्रवाह उतरल्याने; एक शेळी ठार

editor 1 Min Read
1 Min Read

पाचोड (ब्रेकिंग महाराष्ट्र) –  पैठण तालुक्यातिल पाचोड येथे विद्युत प्रवाह उतरून एक शेळी दगावल्याची घटना शनिवारी (दि.९)  दुपारी तीनच्या दरम्यान घडली आहे.  ही शेळी पाचोड येथील मसूद लतीफ मणियार यांच्या मालकीच्या असुन दुपारी घरा नजदीक जात असताना आंगणवाडीला जवळ असणाऱ्या लोखांडी पोलने जमिनीवर विद्युत प्रवाह उतरल्याने एक शेळी दगावल्याचे शेळी पालकाने सांगितले.

सदर शेळ्यांचे अंदाजे वय तीन वर्षे होते.  सध्याच्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे १५ हजार रुपयांंचे नुकसान झाल्याचे शेळी पालकांनी सांगितले.  यावेळी पाचोड पोलिस ठाण्यांचे बीट जमादर गव्हाणे, पोलिस नाईक पवन चव्हाण यांनी पंचासमक्ष पंंचनामा केला आहे.  यावेळी शेळी मालकाला शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Share This Article
Exit mobile version