– सुतार महामंडळ मंजूर करून घेतल्याबद्दल आ. डॉ. रायमुलकर यांचा होणार समाजगौरव
चिखली (विनोद खोलगडे) – विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समिती, बुलढाणा तसेच विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था, देऊळगावराजा यांच्या संयुक्त विद्यमाने सुतार समाजातील दहावी, बारावी, पदवी तसेच पदविका शिक्षणात गुणवान ठरलेल्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी (दि.३०) देऊळगावराजा येथील कुंभारी परिसरातील संत गजानन महाराज भक्तनिवास येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी सुतार महामंडळ मंजूर करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचाही समाजाच्यावतीने कृतज्ञतापूर्वक समाजगौरव होणार आहे.
मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार तथा सुतार समाजाचे भूषण डॉ. संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नामुळे ओबीसी प्रवर्गात असलेल्या सुतार समाजासाठी स्वतंत्र सुतार महामंडळ मंजूर करण्याची घोषणा राज्यातील शिंदे-पवार-फडणवीस सरकारने केली आहे. यानिमित्ताने कष्टकरी असलेल्या या समाजाला आर्थिक प्रगतीची दारे खुली होणार आहे. यानिमित्ताने डॉ. रायमुलकर यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमात त्यांचा समाजगौरव केला जाणार आहे.
————–

