ग्रामीण भागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे

editor 3 Min Read
3 Min Read

प्रताप मोरे

मेरा बु , ता. चिखली  : – नुकत्याच शाळा सुरू झाल्या त्याच बरोबर शेताची पेरणी आटोपली त्यामुळे विद्यार्थी वर्ग आणि शेतकरी वर्ग विविध कागदपत्रासाठी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडे हेलपाटे मारत आहेत परंतू ग्रामीण भागातील विकासाचा कणा समजले जाणारे , तलाठी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी , कृषी सहाययक , शिक्षक हे मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहून अपडाऊन करतात आणि मुख्यालयी राहण्याचे भाडे खिशात घालतात. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना या अधिकारी कर्मचारी वर्गांचा पाठीमागे हेलपाटे मारत वेळ व आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे .

नुकताच गेल्या काही दिवसांपूर्वी १० वि आणि १२ वी निकाल जाहीर झाला असून सर्व शाळा सुरू झाल्याने शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होवून शिक्षकाकडून विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग सुरू झाले असल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी उत्पन्नाचा , रहिवाशी , बोनाफाईट, शाळेची मार्कशीट , टि सी , जातीचा दाखला , वय आदिवास दाखला , आदी कागदपत्रे काढण्यासाठी धावपळ करीत आहेत . त्याच बरोबर शेतकरी वर्गांनी घाईगडबडीत शेताची पेरणी आटोपून घेतली . आणि शेत जमिनी पिकाने हिरवेगार पाहायला मिळत आहे परंतू गेल्या चार ते पाच दिवसापासून संततधार पावसाने हजेरी लावल्याने पिकामध्ये तणाच्या प्रमाणात मोठी वाढ होत चालली आहे . पिकातील तनाचा नायनाट करण्यासाठी शेतकरी वर्ग बाजारातून महागडी तणनाशक औषध आणून पिकामध्ये फवारणी करीत आहे मात्र औषधी फवारूनही पिकातील तन नाहीसे होत नसून उलट पिकांना फटका बसत आहे . त्यामुळे शेतकरी वर्ग पावसामुळे झालेल्या पिकाचे नुकसान तसेच तणनाशक औषधी मूळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याकडे धाव घेवू लागले आहेत मात्र ग्रामीण भागातील विकासाचा कणा समजले जाणारे , तलाठी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी , कृषी सहाययक , शिक्षक हे मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहून अपडाऊन करतात आणि मुख्यालयी राहण्याचे भाडे शासनाकडून दरमहा खिशात घालतात. परंतु शाळकरी विद्यार्थी व शेतकरी वर्गांना आपल्या विविध कागदपत्रासाठी गावातील कार्यालयापुठे दिवसभर वाट पाहावी लागते . एकीकडे शासनाने जनतेच्या सेवेसाठी आपल्या गावातच ग्रा. प . कार्यालयामध्ये महाईसेवा केंद्र सुरू केले . या केंद्राच्या माध्यमातून तात्काळ विविध कागदपत्रे ,देण्याचा संकल्प केला आहे . जनतेला आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून या महाईसेवा केंद्रावर एका ऑपरेटरची नियुक्ती ग्रा.प. च्या खात्यातूनच कर्मचारी व महाईसेवा केंद्राचा खर्च वसूल केल्या जात आहे . मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे ग्रा.प. चे महाईसेवा केंद्र कागदोपत्रीच सुरू असल्याचे पाहायला मिळत असल्याने गावकऱ्यांना कागदपत्रासाठी खाजगी विविध ऑनलाइन केंद्र चालकाकडे जावून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे . तरी संबंधित अधिकारी वर्गांनी त्वरित लक्ष घालून गावाच्या विकासाचा कणा समजले जाणारे , तलाठी ग्रामसेवक ग्रामविकास  अधिकारी , कृषी सहाययक , शिक्षक यांना मुख्यालयीराहण्याची सक्ती करावी अशी विद्यार्थी व शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे .

Share This Article
Exit mobile version