– सर्वजण तुकाराम मुंडेंना टाळत असतान धनंजय मुंडे यांनी स्वतःहून मागवून घेतल्याची चर्चा!
– राज्यातील ४१ सनदी अधिकार्यांच्या बदल्या : अकोला अजित कुंभार, वाशिम भुवनेश्वरी एस. तर कुमार आशीर्वाद यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली
– मनिषा आव्हाळे आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सीईओ’
मुंबई (प्राची कुलकर्णी) – धडाकेबाज व प्रामाणिक सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंडे यांना बहुतांश मंत्री आपल्या खात्याच्या प्रमुखपदी नेमणुकीस टाळाटाळ करतात. परंतु, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे कॅबिनेट मंत्रिपद मिळताच धनंजय मुंडे यांनी स्वतः या खमक्या अधिकार्याला आपल्या खात्यात बोलावले असून, अवघ्या दीड महिन्यांत तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली होऊन, त्यांना आता राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे गलथान कारभाराची बजबजपुरी झालेले हे खाते आता सुतासारखे सरळ होण्याचा मोठाच मार्ग मोकळा झाला आहे. धनंजय मुंडे यांच्यासारखा धडाकेबाज व प्रामाणिक मंत्री आणि तितकाच खमका सचिव मिळाल्याने आता खर्याअर्थाने राज्यातील शेतकरीहिताचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
राज्यातील ४१ आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधी राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. अवघ्या एका महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांना आता कृषी व पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदाचा पदभार देण्यात आला आहे. शिंदे-पवार-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकार्यांच्या बदल्याची यादी शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तसेच कायम चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली झाली असून, आता त्यांना थेट मंत्रालयात सचिवपदी बसवण्यात आले आहे. मुंडे यांची गेल्या १६ वर्षांत तब्बल २० वेळा बदली झाली आहे. महिन्याभरापूर्वीच त्यांना कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तुकाराम मुंडे यांना स्वतः या खात्याचे कॅबिनेट मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्याकडून आपल्या खात्यात मागवून घेतले असल्याची खात्रीशीर माहिती मंत्रालय सूत्रांकडून मिळते आहे.
– सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी –
1. राजेंद्र शंकर क्षीरसागर यांची मुंबई शहर कार्यालयात जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
2. वर्षा ठाकुर-घुगे यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
3. संजय चव्हाण यांची अतिरिक्त कंट्रोलर ऑफ स्टॅम्प, मुंबई कार्यालयात बदली करण्यात आली आहे. ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेत विशेष कार्यकारी अधिकारी होते.
4. आयुष प्रसाद यांनी जळगावच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
5. श्रीमती भुवनेश्वरी एस. यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती
6. अजित कुंभार यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली
7. श्रीकृष्णकांत पांचाळ यांची जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
8. डॉ. पंकज अशिया यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
9. कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
10. अभिनव गोयल यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
11. सौरभ कटियार यांची झेडपी अकोला मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन अमरावती कार्यालयात जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
12. तृप्ती धोडमिसे यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली पदावरुन सांगली झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
13. अंकित यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
14. शुभम गुप्ता यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली SDO, पो.भारमरागड, ITDP, गडचिरोली पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
15. मीनल करनवाल यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, नंदुरबार पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
16. डॉ.मैनाक घोष यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
17. मनीषा माणिकराव आव्हाळे यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
18. सावन कुमार यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, ITDP, अमरावती पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
19. अनमोल सागर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२०. आयुषी सिंग यांची पालघरच्या जवाहर येथील आयटीडीपी प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकारी पदावरुन गडचिरोलीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती
२१. वैष्णवी बी यांची भंडारा येथील तुमसर उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी पदावरुन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली
२२. पवनीत कौर यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारी पदावरुन पुण्याच्या जीएसडीए संचालक पदी बदली
२३. गंगाथरण डी. यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदावरुन मुंबई महापालिकेच्या सह आय़ुक्तपदी बदली
२४. अमोल जगन्नाथ येडगे यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदावररुन महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण येथे बदली
२५. शानमुगराजन एस. यांची वाशिम जिल्हाधिकारी पदावरुन अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) मुंबई येथे बदली
२६. विजय चंद्रकांत राठोड यांची जालना जिल्हाधिकारी पदावरुन महाराष्ट्र उद्योजक विकास महामंडळ मुंबईचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली
२७. निमा अरोरा यांची अकोला जिल्हाधिकारीपदावरुन माहिती तंत्रज्ञान विभाग येथे संचालक म्हणून बदली
२८. वैभव दासू वाघमारे यांची गडचिरोलीतील अहेरी येथे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
२९. संतोष सी. पाटील यांची उपमुख्यमंत्र्यांचे सह सचिव पदावरुन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली
30. आर.के.गावडे यांची झेडपी नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे.
31. आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी, परभणी पदावरून अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
32. संजय खंदारे, यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
33. तुकाराम मुंढे, सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई पदावरून सचिव (AD), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
34. जलज शर्मा. जिल्हाधिकारी धुळे पदावरून यांची जिल्हाधिकारी नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
35. डॉ.ए.एन.करंजकर आयुक्त, ESIS, मुंबई पदावरून यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
36. आर.एस.चव्हाण, सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
37. पृथ्वीराज बी.पी. जिल्हाधिकारी, लातूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
38. रुचेश जयवंशी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, NRLM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
39. मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
40. मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
41. डॉ.बी.एन.बस्तेवाड मुख्य महाव्यवस्थापक (L&S), MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

