चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील पळसखेड दौलत व चांदई येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखांची स्थापना करण्यात आली. काल (दि.११) दिवसभर चांगला पाऊस तालुक्यात झाला. भरपावसांत या शाखांची स्थापना झाली असून, समतेचे राज्य आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन याप्रसंगी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकसिंह सुरडकर यांनी केले.
यावेळी तालुका अध्यक्ष संजय धुरंधर, माजी तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष संजय जाधव, तालुका सचिव जितु निकाळजे, महेंद्र हिवाळे, प्रवक्ते प्रा. मिलिंद मघडे, माजी तालुकध्यक्ष अर्जुन बोर्डे, माजी सरपंच किशोर जाधव, मंगेश जाधव, शाखाध्यक्ष सुरज इंगळे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश जाधव, शांताराम आराख, शाखाध्यक्ष विजय आराख, मनोहर खराडे, शाखा उपाध्यक्ष दीपक आराख यासह महिला व ग्रामस्थांची उपस्थिती होती. गावातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले तर आभार भारत आरख यांनी मानले.
———–

