रक्तदान शिबिरात ३१ बॅग रक्तसंकलन; शिबिरासाठी शाहू परिवाराचा पुढाकार!

editor 1 Min Read
1 Min Read

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – थॅलेसेमिया सिकलसेल रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध नसल्याने वन बुलढाणा मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील शिवाजी महाराज चौकात ५ जुलै रोजी आयोजित रक्तदान शिबिरात ३१ पिशव्या रक्तसंकलन झाले.

राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात युवकांनी भरभरुन सहभाग नोंदवला. थॅलेसेमिया सिकलसेल रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासते. मात्र शासकीय रक्तपेढीत पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. राजर्षी शाहू परिवाराने नेहमीच रक्तदान शिबिरे आयोजित करुन सामाजिक दायित्व निभावले आहे. यावेळी सुद्धा पुढाकार घेऊन युवकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३१ जणांनी रक्तदान केले. राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्या सदस्यांनी रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
शिबिरप्रसंगी सुभाष गायकवाड, प्रा. डॉ. नीलेश गावंडे, पांडुरंग सवडतकर, दीपक गायकवाड, नगरसेवक दत्ता सुसर, युवासेना तालुकाप्रमुख गजानन पवार, विदर्भ शिक्षक पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापक सरला सुरडकर, प्रियंका सुरडकर, निर्मला कर्‍हाडे, पत्रकार काशिनाथ शेळके, संदीप बांबल, विजय महाजन, शाम गायकवाड, संतोष गायकवाड, गोपाल माने, सागर लोखंडे, पुरुषोत्तम हाडे, मोहन काळे, समाधान गायकवाड, अरुण गायकवाड, गणेश धुंदळे, राम लोखंडे आदींची उपस्थिती होती.

Share This Article
Exit mobile version