वर्धा (प्रकाश कथले) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजितदादा पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा देण्याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे १०० पदाधिकारी, कार्यकर्ते आज मुंबईकडे रवाना झाले. मुंबईच्या वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये हे कार्यकर्ते उद्या पोहोचणार असून, तेथे ते जिल्ह्याचे समर्थन शरद पवार यांना जाहीर करणार आहे.
—–

