आळंदी परिसरात संततधार ; रस्त्यावर साचले पाणी!

editor 2 Min Read
2 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : ज्यांची सर्व सामान्य जनता, शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता तो पाऊस अखेर सुरु झाला असून आळंदी पंचक्रोशीत संततधार पाऊस असल्याने रहदारीला तसेच अनेक ठिकाणी खड्यात, साईड पाट्या खराब असल्याने रस्त्याचे दुतर्फ़ा तसेच खराब रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचून रहदारीला गैरसोयीचे झाले.

आळंदी, सोळू, धानोरे, वडगाव घेनंद आणि परिसरात पाऊस झाला असून शेतकरी, नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. कामगार, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना मात्र घरी जाताना आलेल्या पावसाने भिजत जावे लागले. आळंदी वडगाव रस्त्यावरून दुतर्फा पाणी वाहत होते. खड्या मुळे अनेक ठिकाणी वाहने सावकाश जात होती. वडगाव घेनंद येथील भोसे रस्ता वडगाव घेनंद चे हद्दीत मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने रस्त्यावर पाणी साचलेने वाहन चालकाना मात्र वाट काढीत जावे लागले. सुमारे एक किलो मीटरचा रस्ता वडगाव घेनंद हद्दीत खराब झाला असून भोसेकडे जाताना मात्र गैरसोयीचे ठरत आहे. तात्काळ रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची गरज शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर यांनी व्यक्त केली आहे.

आळंदी येथील मरकळ रस्ता, वडगाव रस्त्याचे कडेने पावसाळी गटारात पाणी जात नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहत राहिले. पावसाळी गटर्स कडे पाणी कसे जाईल याचे नियोजन करण्याची मागणी दक्षता सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण नरके यांनी केली. आळंदी नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी पाण्याला वाट करून देताना दमझाक झाल्याचे दिसत होते. पावसाळ्या पूर्वीची कामे तात्काळ करण्याची मागणी यातून पुढे आली आहे.

Share This Article
Exit mobile version