सांगली (संकेतराज बने) – जिल्ह्यातील खाजगी अनुदानीत शाळेतील बहुतांशी मुलं शिक्षण धोरणांतर्गत मिळणाऱ्या मोफत पुस्तकांपासून वंचित राहिली असून, शाळेतच मोफत पुस्तकं भेटत असल्याने व बाहेर बाजारात ही पुस्तकं भेटत नसल्याने, विद्यार्थ्यांवर कोणी पुस्तकं देता का पुस्तकं? अशी हाक मारण्याची वेळ आली आहे. पुस्तकं वाटपात भेदभाव केला जात असल्याचेही बोललं जातं आहे. बाजारात पुस्तके नाही, शाळेत मिळत नाही, अशा परिस्थिती पुस्तके घ्यायची कोठून, हा सवाल निर्माण झालेला आहे.
शिक्षण धोरनानुसार ठरलेल्या किंवा शाळेने पाठवेलेल्या पटानुसार शाळेस साहित्य पाठवण्यात येते. मात्र खाजगी अनुदानीत शाळांना यामधील फक्त मोफत पुस्तकं भेटतात ती ही पटानुसार मिळतच नाहीत.अशी अवस्था कित्येक ठिकाणी पहावयास मिळते.यामध्ये आलेलं शालेय साहित्य वाटप करताना भेदभाव होतं असल्याचं बोललं जात आहे. यासाठी UDISE+आणि सरळ पोर्टल वरील नोंदीबरोबरच प्रत्यक्षात शाळेत किती पट आहे याची खात्री करणे गरजेचे आहे. पोर्टल आणि प्रत्यक्षात पट यातील तफावत काही खाजगी शाळेतचं नसते तर ती इतर शाळांमध्ये सुद्धा असते मात्र पुस्तकं फक्त खाजगी अनुदानीत शाळेतच कमी पडतात असे का? मुळात अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे कि, उर्वरित विध्यार्थ्यांना १५ जुलै पर्यत पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात परंतु तोपर्यंत शिकवलेल शिक्षण आणि त्याची उजळणी वंचित विध्यार्थ्याने कशी करायची हा मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी शिक्षक जुनी चांगली पुस्तकं जमा करून घेऊन उर्वरित विध्यार्थ्यांना देऊन काम चालवत आहेत मात्र हे शासनाच्या शिक्षण धोरणास हरताळ फसण्यासारखे आहे. एकूणच याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी होतं आहे.

