वीरचक धरणात दाेन विद्यार्थी बुडाले

editor 1 Min Read
1 Min Read

नंदुरबार (आफताब खान) – येथील वीरचक धऱणावर पाेहाेण्यासाठी गेलेल्या दाेन विद्यार्थ्यांचा आज दुर्देवी मृत्यू झाला. धरणात पाणी कमी असल्याने व गाळात फसले गेल्याने हे मुले बुडालीत. या घटनेने हळहळ व्यक्त हाेत आहे. मृतदेह पाहून मुलांच्या आई-वडिलांनी एकच हंबरडा फाेडला.

सविस्तर असे, की  आज दिनांक ७ जुलाई २०२२ रोजी मुक्त विद्यापीठ शेवटचे पेपर आपटून ८ विद्यार्थी एकत्र पोहोण्यासाठी वीरचक धरणावर गेले होते.  ध्या धरणात पाणीसाठा कमी झाला असून, मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे.  या गाळात दोन विद्यार्थ्यांच्या पाय फसून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जिजामाता महाविद्यालय येथील मुक्त विद्यापीठात शिकणारे राहुल सुनील वाकडे व कल्पेश भगवान सोनवणे या दोघी विद्यार्थ्यांच्या धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

—————-

Share This Article
Exit mobile version