चिमुकलीवर अत्याचार करुन जिवे ठार मारणार्‍या महिलेसह तीन नराधमांना नंदुरबार पोलीसांनी ठोकल्या बेड्या

editor 2 Min Read
2 Min Read

नंदूरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) – शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील शौचालयाच्या टाकीत दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या बालिकेच्या मृतदेहाच्या उलगडा झाला असून, तिच्यावर नराधमांनी अत्याचार करून गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महिलेसह चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका शौचालयाच्या टाकीत पाण्यावर तरंगताना दोन वर्षीय बालकेच्या मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.  घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके तयार करून रवाना केले होते.

पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी दोनच दिवसांत आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना बेड्या ठोकल्या.  संशयित महिला तिच्या नवरा रणजित पवार,  रवींद्र पावरा, मुकेश आर्य यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संशयित महिला ही तिच्या नवरा रणजित पवार तसेच रवींद्र पावरा, मुकेश आर्य हे गुजरात राज्यातील चलथान येथून नंदुरबार येथे येत असतांना चलथान परिसरात संशयित महिलेस एक लहान मुलगी रडताना दिसल्यावर महिलेने व तिच्यासोबत असणाऱ्या इसमानी त्या लहान मुलीस संगणमताने उचलून घेतले व त्यानंतर नंदुरबारच्या रेल्वे स्थानक येथे बेकायदेशीर हेतूने आणले.

नंदुरबार येथे रात्रीच्या वेळेस रणजित, रविंद्र, मुकेश यांनी त्या चिमुकलीला रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका सेफ्टी टेकजवळील भागात आणले, त्यावेळी संशयीत महिला ही रस्त्यावर उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी उभी होती.  संशयीत महिला हिचा रणजित पवार याने त्या अनोळखी दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला, जिवाच्या आकांताने रडणान्या त्या चिमुकलीचा रणजित याने गळा आवळून खून केला. त्यानंतर सर्वांनी मिळून तिचे प्रेत रेल्वे कॉलनी परिसरातील नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका सेफ्टी टेकमध्ये फेकून दिले होते.

Share This Article
Exit mobile version