वाशिम (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात बोगस मुन्नाभाईचा सुळसुळाट झाला असताना, किन्हीराजा येथील बोगस मुन्नाभाईवर जिल्हा आरोग्य अधिकार्याच्या पथकाने छापा टाकून, रंगेहाथ पकडत, कायदेशीर कारवाई केली आहे. हा बोगस डॉक्टर गेल्या दहा वर्षांपासून किन्हीराजात वैद्यकीय व्यवसाय करत होता.
वाशिमच्या किन्हीराजा येथे १० वर्षांपासून बोगस मुन्नाभाई आपली दुकान थाटून बसलेला होता. याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या टीमने छापा टाकून या बोगस डॉक्टरावर कारवाई केली व गुन्हा देखील दाखल करण्यात आला. यावर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना दिले. पंधरा १५ दिवस उलटूनही जिल्हा आरोग्य विभाग कारवाई करण्यासाठी अपयशी ठरले की काय, अशा चर्चेचा उधाण आले आहे.

