भरधाव ट्रॅव्हल्सने स्कुटीला ठोकारले, मायलेकी गंभीर जखमी

editor 1 Min Read
1 Min Read

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – भरधाव खासगी ट्रॅव्हल्सने स्कुटीला जोराची धडक दिल्याने आईसह मुलगी गंभीर जखमी झाली असून, डोणगाव रोडवर आज सकाळी घडली. या घटनेत दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर मेहकर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मेहकर ते सुरत जाणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या बस (क्रमांक जी.जे.१४- ५५००) चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून स्कुटीवर जाणार्‍या मायलेकींना ठोकारले. हा अपघात डोणगाव रोडवर आज सकाळी घडला. यात स्कुटी (क्रमांक एम.एच.२८ बी.एस. ७६६८)चे मोठे नुकसान तर झालेच, परंतु मायलेकी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात इतका भीषण होता, की स्कुटी बसखाली चिरडली गेली होती व अडकून पडली होती. पल्लवी विशाल काळे (वय ३१, रा. मेहकर) व त्यांची मुलगी आरोही विशाल काळे (वय ११) अशी अपघातातील गंभीर जखमी मायलेकींची नावे आहेत. या अपघातात आरोही हिचा उजवा पाय प्रâॅक्चर झाला असून, तिची आईलाही मार लागला आहे. या दोघींनाही मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास मेहकर पोलिस करत आहेत.
—————

Share This Article
Exit mobile version