बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आजदेखील भरधाव स्वीफ्ट कारने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला असून, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले होते.
या घटनेची बिबी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, चालक भरत लक्ष्मण शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एपीआय सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख हे करत आहेत. या कारमधून तिघे शिंदे बंधू प्रवास करत असल्याची माहिती हाती आली आहे. चालकासह इतर बंधू जखमी आहेत.
——————

