दुभाजकावर टिप्पर धडकला, दोघे जखमी

editor 1 Min Read
1 Min Read

दुभाजकावर टिप्पर धडकला, दोघे जखमी

वाशिम (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मानोरा शहरातील झेंडा चौकात अकोला – आर्णी महामार्गावर टाकलेल्या दुभाजकाला भरधाव टिप्पर धडक होऊन झालेल्या अपघातात टिप्पर पलटी झाल्याची घटना आज पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक व त्याचा सहकारी जखमी झाले आहेत.
या अपघातामुळे टीप्परचे मोठं नुकसान झालं असून मानोरा पोलीस पुढील तपास करत आहेत. वाशिमच्या मानोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची अवैधरित्या वाहतूक होते. या अपघाताने ही अवैध गौणखनिज वाहतूक चव्हाट्यावर आली आहे.
————

Share This Article
Exit mobile version