चिखलीचे माजी आमदार जनुभाऊ बोंद्रे कालवश

editor 1 Min Read
1 Min Read

नाशिक/चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले जनुभाऊ अर्थात जनार्धन बोंद्रे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते. त्यांच्या निधनाने चिखलीसह जिल्हाभरात शोकसंवेदना प्रगट होत आहेत.
प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. तेथेच त्यांच्या इच्छेखातर देहदान करण्यात आले. स्व. बोंद्रे यांनी चिखली तालुक्याच्या विकासात आपले महत्वपूर्ण योगदान तर दिलेच; परंतु, काँग्रेस संघटनेची तळागाळात बांधणी करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले.

Share This Article
Exit mobile version