देऊळगावमाळीची सुकन्या अनुजा मगर हिची वैद्यकीय पीएचडीसाठी दक्षिण कोरियाला निवड

editor 1 Min Read
1 Min Read

मेहकर (रवींद्र सुरूशे) – तालुक्यातील देऊळगाव माळी हे असे गाव आहे की, या गावातील प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर येथील भूमिपुत्र कार्यरत आहेत. कलेक्टर, डॉक्टर, वैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, अशा प्रत्येक क्षेत्रात या गावाचे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रत्येक पाऊल पुढे आहे. आता पुन्हा एकदा देऊळगावमाळीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला गेला आहे, तो अगदी सातासमुद्रापार दक्षिण कोरिया मध्ये. गावाची सुकन्या कु.अनुजा मगर हिची मेडिसिन पीएच.डीसाठी दक्षिण कोरिया येथे निवड झाली आहे.

दक्षिण कोरिया येथील हॉलिम युनिव्हर्सिटी सेऊल विद्यापीठाकडून (२.५ दशलक्ष कोरियन वॉन) १ लाख ६० हजार प्रतिमाह मानधन तिने मिळवले आहे. अनुजा गजानन मगर हिची निवड दक्षिण कोरिया येथील हॅलिम युनिव्हर्सिटी सेऊल यांनी घेतलेल्या मौखिक परीक्षेत पीएचडी शिक्षणासाठी निवड झाली. यासाठी तिला पुणे येथील एनसीएलचे शास्त्रज्ञ डॉ. महेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. हे मानधन आजपर्यंतचे सर्वात जास्त मानधन आहे. तिला आयपीक्यूएचे विभाग प्रमुख डॉ. एस.एस. चालीकवार, डॉ. कैलास मोरावकर, डॉ.भूषण भैरव यांनी मार्गदर्शन केले. अनुजा मगर हिचे प्राथमिक शिक्षण देऊळगाव माळी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत झाले तर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाची ती माजी विद्यार्थिनी आहे. आपल्या यशाच श्रेय हे अनुजाने तिचे आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक, व चांगले सहकारी मित्र यांना दिले आहे. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share This Article
Exit mobile version