प्रेमीयुगुलाची पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या!

editor 1 Min Read
1 Min Read

बुलढाणा (बाळू वानखेडे) – अवघ्या १६ वर्षीय समवयस्क मुलगा व मुलीने जळगाव जामोद पोलिस ठाणेहद्दीतील कहूपट्टा येथे पळसाच्या झाड़ाला एकाच दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. काल रात्रीची ही घटना असून, आज १६ एप्रिल रोजी उघड़कीस आली. प्रियंका भायलाल मसाने व आकाश पन्नालाल ड़ावरा असे मृतकांचे नाव असून, प्रेमप्रकरणातून हा दुर्दैवी प्रकार घड़ल्याचे समजते.

कहूपट्टा गावाबाहेरील थानसिंग मोरे यांच्या शेतातील पळसाच्या झाड़ाला प्रियंका भायलाल मसाने व आकाश पन्नालाल ड़ावरा हे १६ वर्षीय समवयस्क युगुल दोघेही रा. कहूपट्टा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. आज सकाळी ही बाब काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. जळगाव जामोद पोलिसांना या घटनेची माहिती होताच तातड़ीने पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जामोद येथे आणल्याचे तपास अधिकारी पीएसआय शिवानंद वीर यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. या घटनेने जळगाव जामोद तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

https://youtu.be/_z3jBYq7GIU

————–

Share This Article
Exit mobile version