येळगाव टोलनाक्याजवळ भीषण अपघात, तरुण जागीच ठार

editor 1 Min Read
1 Min Read

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लक्झरी बस आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील सव येथील तरुण मिलिंद पवार हा जागीच ठार झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झालेले आहेत. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चिखली-बुलढाणा मार्गावरील येळगाव टोलनाक्यानजीक हा भीषण अपघात झाला. कार तर अक्षरशः चक्काचूर झाली आहे.

अपघातातील लक्झरी बस ही बुलढाण्याहून चिखलीमार्गे पुण्याकडे जात होती. तर खासगी कार ही चिखलीहून बुलढाण्याकडे येत होती. येळगाव टोलनाक्याजवळील अ‍ॅड. साखरे यांच्या फार्म हाऊसजवळ लक्झरी व कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण धडकेत मिलिंद पवार हा सव येथील तरूण जागीच ठार झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्युमुखी पडलेला मिलिंद पवार हा बाऊन्सर म्हणून काम करत होता, अशी माहिती हाती आली आहे. तिघा जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून, अधिक तपास बुलढाणा पोलिस करत आहेत.
————

Share This Article
Exit mobile version