मूकबधिर’ दीपाली व आशीषची झाली सगाई !

editor 1 Min Read
1 Min Read

बुलडाणा( राजेंद्र काळे)  – शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या चि.सौ.का.दीपाली हिचा विवाह सध्या बुलडाणा येथे रहिवासी असणाऱ्या चि. आशीष याच्याशी उद्या, मंगळवार ५ जुलै रोजी बुलडाणा अर्बनच्या तोरणदारी सहकार विद्या मंदिर येथील सांस्कृतिक भवनात ‘राष्ट्रीय महोत्सव’ म्हणून साजरा होणार आहे. हे लग्न तामिळी, महाराष्ट्रीयन अन् राजस्थानी अशा तिन्ही पध्दतीने होणार असल्यामुळे त्याची उत्कंठा शिगेलाच पोहोचली आहे. दरम्यान ‘मूकबधिर’ असणाऱ्या दाम्पत्याची सगाई अर्थातच ‘रिंग सेरेमनी’ आज, रविवार ३ जुलै रोजी बुलडाणा येथे वरद अपार्टमेंटला पार पडली. त्यानंतर बाबांच्या आश्रमातीलच पूजा प्रविण डवरे व पायल रविंद्र गाडेकर या दोन मुलींनी दीपालीच्या हातावर नक्षीदार मेहंदी रेखाटली.

स्व.अंबादास पंत वैद्य दिव्यांग बालगृह वझ्झर फाटा या आश्रमात असणारी शंकरबाबांची मानसकन्या हिचा विवाह बिहारीलाल जांगिड यांचे सुपुत्र आशिष यांच्याशी जुळला असून राजस्थानी पध्दतीने जयपूर येथील पुरोहित वृंद आणून या दाम्पत्याचा साखरपुडा संपन्न झाला.

दिपालीचे कन्यादान जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती करणार असून, ते तामिळी असल्यामुळे या दाम्पत्याच्या इच्छेने आधी तामिळी पध्दतीने तिचा विवाह सोहळा होईल. महाराष्ट्रीयन पध्दतीने सायंकाळी मंगलाष्टके म्हणून भव्य सोहळा होईल. यावेळी अनंताभाऊ देशपांडे यांनी तयार केलेली मंगलाष्टके तेच गाणार आहेत. त्यानंतर मध्यरात्री राजस्थानी पध्दतीने फेरे घेऊन हा विवाह सोहळा पार पडणार आहे. अशा तिन्ही संस्कृतीचा मिलाप असणारा हा सोहळा ठरणार लक्षणीयच…

Share This Article
Exit mobile version