आपण जेव्हा लहान होतो तेव्हा मुंबईत लोकलनेच प्रवास करत होतो. या प्रवासात माझीही अनेकवेळा छेडखानी झाली आहे. एवढेच नव्हे तर नंतर कॉलेजमध्ये असताना तर अनेकवेळा असे दुर्देवी प्रसंग आले. त्यामुळे लोकलमध्ये होणारी तरुणींची छेडखानी रोखण्यासाठी रेल्वेने ठोस पाऊले उचलावी, अशी मागणी अभिनेत्री रविना टंडन हिने केली आहे.
रविना म्हणाली, की मध्यमवर्गीय मुलींप्रमाणे मीही मुंबईत स्ट्रगल केलेले आहे. माझेही अनेकदा शारीरिक शोषण झाले आहे. परंतु, असे प्रसंग विसरून पुढे जायाचे असते. रेल्वेने तरुणींच्या सुरक्षतेतीच काळजी घ्यावी. तसेच, छेडखानी रोखण्यासाठी ठोस पाऊसे उचलावीत, असेही ती म्हणाली. टीन एजमध्ये मी मिडल क्लास मुलींप्रमाणे लोकल किंवा सिटी बसनेच प्रवास करत होते. १९९२ मध्ये मी पहिली कार खरेदी केली. आरेत मेट्रो शेड तयार करू नये, अशी मागणीही रविनाने केलेली आहे.
मुंबई लोकलमध्ये माझीही छेडछाड!

