कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्ती!

editor 1 Min Read
1 Min Read

कोल्हापूर/ सांगली (संकेतराज बने) – कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची वेळ आली आहे. कुरुंदवाडमधील जमिनी वादाच्या प्रकरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले गेल्याने न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. १९८४ पासून हा खटला चालू होता. आता न्यायालयाने नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीचे आदेश काढले आहेत.

सविस्तर असे, की कुरुंदवाडमधील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठीचा वाद सुरू होता. यामध्ये कुरुंदवाडमधील वसंत संकपाळ यांची रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमीन घेतली होती. जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने १९८४ पासून खटला चालू होता. प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश काढले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकारी आणि वकील दाखल आहेत. न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपट़ॉप, गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
——————

Share This Article
Exit mobile version