‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या साप्ताहिक विंगच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी संतोष थोरहाते

editor 2 Min Read
2 Min Read

हिवरा आश्रम, ता. मेहकर (प्रतिनिधी) – देशपातळीवर काम करणार्‍या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील साप्ताहिक ‘निर्भिड सारथी’चे मुख्य संपादक तथा राज्यस्तरावरील आघाडीचे डिजिटल मीडिया असलेल्या ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संचालक-संपादक संतोष थोरहाते यांची निवड करण्यात आली आहे. ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी नुकतेच नियुक्तीपत्र देऊन थोरहाते यांची निवड केली.

संतोष थोरहाते गेल्या अनेक वर्षांपासून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियात कार्यरत असून, निर्भिड सारथी या साप्ताहिकाचे मुख्य संपादक – मालक आहेत. ते गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून, ते दैनिक सकाळ या वृत्तपत्राचे पत्रकार आहेत. व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, सरचिटणीस चंद्रमोहन पूप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने, ग्रामीण प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के आदींनी साप्ताहिक विंगची प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी विनोद बोरे यांना दिली आहे. त्यानुसार राज्य कार्यकारिणी आणि महाराष्ट्रभरातील जिल्हाध्यक्षांची नियुक्ती विनोद बोरे हे करत आहेत. याकामी राज्यभरात साप्ताहिक विंगचे संघटन वाढवण्यासाठी संतोष थोरहाते यांचे मोलाचे योगदान मिळणार असल्याचे विनोद बोरे यांनी नियुक्तीप्रसंगी म्हटले आहे. संतोष थोरहाते यांनी डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स व प्रिटींग क्षेत्रात आपल्या कार्याच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या विषयांवर त्यांची चांगली पकड आहे. आपल्या शोधपत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषयांना न्याय दिला आहे. संतोष थोरहाते हे हिवरा आश्रम अपडेट या चॅनलचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहे. तसेच, राज्यातील आघाडीची डिजिटल मीडिया असलेल्या ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे ते संचालक-संपादक आहेत. त्यांना गेल्या अनेक वर्षांचा पत्रकारिता क्षेत्राचा गाढा अनुभव आहे. थोरहाते यांच्या विधायक पत्रकारितेची दखल घेत त्यांना दर्पण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून मुलाखतीव्दारे समाजातील प्रतिभावंत आरोग्य, कृषी, शिक्षण, साहित्यिक, कला क्षेत्रातील व्यक्ती, खेळाडू, उद्योगक्षेत्रात गगनभरारी घेतलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा जीवन प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून प्रकट केला आहे. संतोष थोरहाते यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी निवडीबद्दल ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक पुरुषोत्तम सांगळे, संपादक हेमंत चौधरी, संजय जोशी, गणेश मुंढे, प्रकाश कथले, संपादिका प्राची कुलकर्णी-मानकर, कार्यकारी संपादक प्रशांत खंडारे आदींनी अभिनंदन केले आहे.

Share This Article
Exit mobile version