अखेर मजुरांना मिळाले जेवणाचे डबे!

editor 1 Min Read
1 Min Read

सिंदखेडाजा (तालुका प्रतिनिधी) – सिंदखेडराजा तालुक्यामधील पिंपळगाव सोनारा येथील सरपंच यांच्या मागणीला अखेर यश आले असून, तेथे कामगार कल्याण योजनेअंतर्गत मजुरांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पिंपळगाव सोनारा येथील सरपंच यांनी मजुरांना काम नसताना मजुराची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी केली होती. त्याची दखल घेऊन कामगार कल्याण योजनेंतर्गत मजुरांना शासनाकडून जेवणाचे डबे अखेर मिळाले आहे. सरपंच तोताराम भगवान ठोसरे, दत्तू आजा ठोंसरे, सिंदखेडराजा कृषी उत्पन्न माजी सभापती बंडू ठाकूर, रामदास घोगे, अमोल साखरे यांच्याहस्ते गावामध्ये हे डबे वाटप करण्यात आले. मजुरांना रोज दोन वेळा जेवणाच्या डब्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Share This Article
Exit mobile version