आमदार संदीपान भुमरे समर्थनार्थ हजारो शिवसैनिक रस्त्यावर,कार्यकर्त्यांचे रजापूर येथे शक्तिप्रदर्शन

editor 1 Min Read
1 Min Read

पाचोड/( विजय चिडे) ठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे रजापूर येथे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यतील राजकीय परिस्थिती पाहता म.वि.आ.मध्ये सतत दूजाभाव मिळत आल्यामुळे, योग्य न्याय मिळत नसल्यामुळे शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट निर्माण झाला. या गटाला जाहीर असा पाठींबा आ.संदिपान भुमरे यांनी दिला असून पैठण तालुक्यात भुमरेचे असंख्य समर्थक असून त्यांनी आज रजापूर येथे त्यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
          शिवसैनिकांनी आ.भुमरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत मोठे शक्तिप्रदर्शन केले असून मोठी रॅली काढून घोषणा देण्यात आल्या. त्यांना मंत्रिपद मिळाले आहे, मात्र निधी भेट नाही तसेच राष्ट्रवादी त्रास देत असल्याच्या व्यथा शिवसैनिकांनी व समर्थकांनी मांडल्या. आ. भुमरे जे निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तुम्ही बांधलं ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण,आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत असा हुंकार देत होते यावेळी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून हजारो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.या रँली साठी पाचोड सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे,उपनिरिक्षक सुरेश माळी,बीट जमादार शिरसागर,पोलिस कर्मचारी दुलत,विलास काकडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Share This Article
Exit mobile version