काळ्याबाजारात धान्य विकतांना गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले!

editor 1 Min Read
1 Min Read

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – ज्या शिक्षणाचा पाया प्राथमिक शाळेत घातल्या जातो त्याच शाळेचा मुख्याध्यापक जर चोरी करत असेल तर? हा प्रश्न अनेकांना अचंबित करणारा आहे. चक्क मुख्याध्यापकालाच चोरी करताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले आहे.

सविस्तर असे, मेहकर तालुक्यातील शहरापासून जवळच असलेल्या जामगाव येथील मराठी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक मुरलीधर डोंगरदिवे हे शाळेतील मुलांच्या पोषण आहाराची चोरी करताना गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले आहे. त्यावेळी शाळेच्या आवारात संपूर्ण गावकरी जमा झाल्यामुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला. परंतु गावातील जुन्या जाणत्या मंडळींनी सामंजस्याची भूमिका घेऊन मुख्याध्यापक डोंगरदिवे यांना मेहकर पोलिस स्टेशनमध्ये आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावेळी गावातील असंख्य गावकरी तेथे उपस्थित होते.

ज्या शाळेमध्ये मुलांना संस्काराचे धडे दिले जातात, त्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक हे त्या लहान मुलांना शासनाच्यावतीने देण्यात येणारा पोषण आहारावर डल्ला मारत असतील, तर इतरांचं काय? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यावेळी शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करून चौकशी करून निर्णय घेऊ, अशी माहिती दिली.

Share This Article
Exit mobile version