बुलडाणा-(ब्रेकींग महाराष्ट्र) शिवसेना पक्षातील अंतर्गत वादाला आता वेगळेच वळण मिळाले असून उध्दवजी ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन गट पडल्याने अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे गटाच्या आमदार व कार्यकर्त्यांच्या कार्यालयाची तोडफोड सुरु असून त्यामध्ये शिवसेनेचे खा.संजय राऊत प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रीया देवून शिवसैनिक रोडवर उतरण्याची भाषा बोलत आहे. बुलडाणा जिल्ह्यात मात्र शिवसैनिकांना कोणत्याही प्रकारचा आदेश नसल्याचे बोलल्या जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर जर शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट वेगळा झाला तर पालघरमध्ये संतांचा निर्घूण हत्या करण्यात आली, त्यावेळी शिंदे गट काय करीत होता? आणि आ.अब्दुल सत्तार हिंदुत्वाच्या मुद्यावर शिंदेंच्या गटासोबत कुठपर्यंत चालतात, हा ही प्रश्न उपस्थीत केल्या जात आहे. आज शनिवार 25 जून रोजी आ.संजय गायकवाड यांनी बुलडाणा येथील कार्यकर्त्यांना दुरध्वनीवरुन संदेश देवून आपण शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच असल्याचे सुतोवात देवून त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती तोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोणत्याही क्रांतीकारी आंदोलन व सभेची सुरुवात करण्यासाठी कार्यकर्ते गांधी भवन येथे एकत्रित येतात, असे बोलल्या जाते. मात्र, एकनाथ शिदे व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे असे दोन गट शिवसेनेमध्ये पडल्याने आम्ही उध्दव साहेबांचे समर्थक तर काही आ.संजय गायकवाड यांचे समर्थक संजुभाऊ उध्दवजींसोबतचे प्रसिध्द पत्रक काढून प्रसिध्दी मिळून घेत आहे. परंतु कोण उध्दव साहेबांचे व कोण शिंदे साहेबांचे समर्थक हेच या राजकीय घडामोडीत स्पष्ट न झाल्याने कोण कोणाचे समर्थक हे मात्र गुलदस्त्यातच आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी सन 2019च्या विधानसभा निवडणूकीसाठी धर्मवीर आ.संजुभाऊ गायकवाड यांच्या टिकीटासाठी उध्दवजींसोबत चर्चा केली होती, त्यावेळी सर्व शिवसैनिकांनी मनाभावाने संजुभाऊंना मोठया मताधिक्याने निवडून सुध्दा आणले होते.
भाजप-सेना युती असतांना युतीचे पालन न झाल्याने भाजपाचे टिकीट न मिळाल्याने नाराज झालेले योगेंद्र गोडे अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी उभे राहीले होते, त्यांना भाजपाचा छुपा पाठींबा दिल्याचा आरोपही त्यावेळी शिवसेनेच्या काही नेत्याकडून करण्यात आला होता. तर आ.संजय रायमुलकर हे खा.जाधवांचे मानसपूत्र असल्याचे संबोधल्या जाते, असे हे दोन्हीही आमदार खा.प्रतापराव जाधव यांच्या जवळचे असतांना त्यांना काहीही न सांगता एकनाथ शिंदेसोबत प्रथम सुरत व नंतर गुवाहाटी गेले, त्या दरम्यान दोन्ही आमदारांचे भ्रमणध्वनी नॉट रिचेबल असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याचे खासदार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले, तसेच खा.जाधव यांनी 21 जून रोजी उध्दवसाहेबांचा दुपारी फोन आल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती, मात्र त्या दिवशी खा.जाधव रात्री 10 वाजेपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातच होते. त्यानंतर मुंबई व नंतर दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली.
शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच-आ.संजय गायकवाड
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आ.धर्मवीर संजय गायकवाड यांनी शिवसैनिकांना दुरध्वनीवरुन संदेश जारी करुन सांगीतले, मी शिवसेनेमध्येच आहे, आणि शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेमध्येच राहणार असून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार आमच्या नसा-नसामध्ये भिनलेले असून, मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असलेली युती तोडण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
बुलडाण्यात शिवसैनिकांची मातोश्री जनसंपर्क
कार्यालयासमोर शिवसेना जिंदाबादची घोषणा!
आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या मातोश्री जनसपंर्क कार्यालय येथे आज 25 जून रोजी आ.संजुभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ असंख्य शिवसैनिक एकत्र आले होते. त्यांनी सर्वांनी आम्ही आ.संजुभाऊ गायकवाड यांच्यासोबत असल्याचे सांगितले. यामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मुन्ना बेंडवाल, संदीप गायकवाड, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण निमकर्डे, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पाटील, विभाग प्रमुख निलेश पाटील, ओमसिंग राजपूत, सुनील भाग्यवंत, युवासेना विधानसभा समन्व्यक दीपक तुपकर, नगर सेवक आशिष जाधव, दीपक सोनुने, बाळासाहेब धुड, उमेश कापुरे, कैलास माळी, गोविंदा खुमकर, मनोज यादव, मोहन पऱ्हाड, सचिन हिरोळे, बाबा कुरेशी, शिवसेना सरपंच प्रवीण जाधव, सुहास वानेरे, भानुदास हुंबड, उपसरपंच देवा दांडगे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख विश्वम्भर लांजुळकर, उपशहरप्रमुख शाम पवार, बंडू आसबे,विनायक हाडे,माणिकराव सावळे, नंदू लवंगे, सचिन देशलहरा जीवन उबरहांडे, प्रकाश पांडे, युवासेना उपतालुका प्रमुख गणेश राजस, अनिल किरोचे, प्रसाद हुंबड, श्रीकांत खीर्डेकर, सुभाष पुरी, विनोद सपकाळ, विशाल शेळके, सांडू पाटील, अनिल जगताप, गुलाब शिराळ, गणेश पाटील, राजु पडोळकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांचा समावेश होता.
सेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, मोताळा
व बुलडाणा तालुका प्रमुख मात्र गैरहजर !
शिवसैनिकांनी आ.संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ बुलडाणा येथील मातोश्री कार्यालयासमोर शेकडोच्या संख्येने एकत्रीत येवून त्या सर्वांनी आम्ही आ.संजय गायकवाड यांच्यासोबत असल्याचे सांगितले. धर्मवीर संजुभाऊ गायकवाड तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी, हिंदुह्दय सम्राट माननीय बाळासाहेबांचा ठाकरे यांचा विजय असो, हा आवाज कुणाचा शिवसेनेचा अश्या प्रचंड घोषणांनी परिसर दणाणून केला होता. मात्र यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख जालींधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, बुलडाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर व मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर गैरहजर असल्याने, कोण कोणासोबत असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

