दक्षिण सोलापूर पंचायत समिती आवारात पाणपोईचे सोय!

editor 1 Min Read
1 Min Read

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पंचायत समिती दक्षिण सोलापूर आवारात ग्रामीण भागातील येणाऱ्या अभ्यागत ग्रामस्थांसाठी यंदाही थंड पाण्याचे पाणपोईचे उद्घाटन नूतन सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षण योगेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्या उन्हाळ्याच्या झळा बसत असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक नागरिक कामानिमित्त दक्षिण पंचायत समितीमध्ये येतात. अशावेळी या आलेल्या नागरिकांना थंड पाण्याची सोय व्हावी, यासाठी या पाणपोईची सोय केली आहे. याप्रसंगी गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, लेखाधिकारी स्थानिक निधी सरताज शेख, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विश्वजीत लिंगराज कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा. लेखाधिकारी जगदीश मेटकरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आप्पासाहेब गायकवाड, तजमुल मुतवली, इस्माईल मुलानी, विशाल कुंभार, बाळासाहेब म्हमाने, शकुंतला जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Share This Article
Exit mobile version