मेरा बु ता चिखली (प्रतिनिधी ) मनुष्य एक आहे मात्र त्याला जात धर्म लावून त्याची परिभाषा वेगळी करुण दिलेली आहे . त्याच प्रमाणे मुस्लिम समाजाची मशीद आणि मशिदीमध्ये घेतली जाणारी प्रार्थना ही सुध्दा सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी एकसमान आहे असे मार्गदर्शन डॉ. सैय्यद रफीक, पारनेरकर, अहमदनगर यांनी केले .
कार्यक्रमाच्या सुरवातीला मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली . आणि ठाणेदार गणेश हिवरकर , हभप महाराज , यांची भाषणे झाली यावेळी अहमदनगर येथील डॉ. सैय्यद रफीक पारनेरकर,यांनी उपस्थित सर्व जातीधर्माच्या लोकांना मार्गदर्शन केले की पैगंबर , गौतम बुध्द अल्लाहने आणि
भगवंताने तुम्हाला पृथ्वी तलावावर एका पुरुष व एका स्त्री पासुन निर्माण केले आहे . मग तुमची राष्ट्रभाषा व तुम्हाला लावलेला जातधर्म वेगवेगळा असला तरी आपण सर्व एकच आहोत . आपला देश विविध आस्था आणि धारणांचा देश आहे, सांप्रदायिक सदभावना जोपासण्यासाठी सर्व धर्माची माहिती असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता बंधुता, प्रेम, जातीय सलोखा वृध्दींगत व सामाजिक एकात्मतेच्या सलोखाचे प्रयत्न म्हणुन मस्जिद काय असते? मस्जिद मध्ये प्रार्थना कशी केली जाते ? दिव्य कुरआन , ईद मिलन व मस्जिद यावर डॉ सय्यद यांनी मार्गदर्शन केले .
यावेळी प्रमुख वक्ते डॉ. सैय्यद रफीक पारनेरकर, अहमदनगर ,इस्ताईक भाई अकोला , मुक्ती जुनेद शेगाव , हाफिज मुदसिर बुलढाणा , हाफिज मुजाहिद बुलढाणा , ठाणेदार गणेश हिवरकर अंढेरा ,पत्रकार प्रताप मोरे , फारुख देशमुख , पत्रकार शेख हनिफ , शेख कौसर , प्रशात सोनुने , सुभाष देव्हडे , जि.प.सदस्य अशोकराव पडघान , राष्ट्रवादी ता अध्यक्ष गजानन वायाळ ,मनोज खेडेकर , डॉ विकास मिसाळ ,रा. उपाध्यक्ष भिका पाटील , सो अध्यक्ष सुनिल पाटील , भागवात थुट्टे ,रफिक सर ,मुक्तार सर ,राजू शेख सर ,उदार , लिम्बाजी काळे ,नंद किशोर घोडे ,गणेश खराडे ,प्रविण वराडे , महेंद्र वाघमोडे , उध्धव घुबे ,बाजीरावजी महाराज काळे , प्रल्हाद अवचार , सुनिल गवई , दिपक शिंगणे ,गजानन वराडे,पो कॉ झिने , पवार , पोफळे लक्ष्मण उदार ,आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते .

