देऊळगाव साकरशा येथील इसाई माता संथान येथे आज राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सव

editor 1 Min Read
1 Min Read

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील इसाई माता संस्थान (गराशागड़)च्यावतीने संस्थान परिसरात राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवाचे आयोजन दिनांक ५ मार्चरोजी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आले आहे.

इसाई माता संस्थान देऊळगाव साकरशाच्यावतीने दरवर्षी राज्यस्तरीय होळी महोत्सव आयोजित केल्या जातो. दिनांक ५ मार्चरोजी आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून बंजारा समाजाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण राहणार असून, इसाई माता संस्थान संचालक रामदास महाराज व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी कार्यक्रमाला बंजारा समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थान अध्यक्ष तथा व्यवस्थापक बळीराम रायसिंग भगत महाराज, मोहनसिंग राठोड, बबन चव्हाण, मदन महाराज, परशराम नाईक, मधुकर राठोड, देविचंद राठोड, रंगलाल राठोड, मांगू राठोड, माणिक चव्हाण, लक्ष्मण पवार, बी. एम. राठोड, विजय चव्हाण, सीताराम महाराज, आनंद राठोड, सुरेश राठोड, जयसिंग चव्हाणसह व्यवस्थापन समिती तसेच परिसरातील गावकरी, नायक, कारभारी, नसाबी, हासाबी आदिंनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version