खामगांव (विशेष प्रतिनिधी) करार पद्धतीने झालेली चालक पदाची भरती तात्काळ रद्द करून चालक तथा वाहक सरळ सेवा भरती घेऊन नियुक्ती देण्यात यावी तसेच प्रशिक्षण बाकी असणाऱ्या उमेदवाराचे तात्काळ प्रशिक्षण सुरू करण्या यावे अशी मागणी प्रशिक्षण पुर्ण झालेल्या उमेदवारा कडून २४ जुन रोजी राज्य परिवहन विभाग बुलडाणा यांच्याकडे करण्यात आली आहे.
प्रशिक्षण पूर्ण व प्रशिक्षण बाकी असलेल्या उमेदवारा कडुन देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.की, आम्ही सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुले असून आमचे चालक तथा वाहक सरळ सेवा भरती २०१९ मधील सेवापूर्व पूर्ण झालेले तसेच काही जणांचे प्रशिक्षण बाकी आहे. सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण झालेले असून अंतिम वाहन चाचणी आगोदर कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे अंतिम वाहन चाचणी भरती थांबवण्यात आली परंतु आता सद्या राज्यात कोरोना संपुष्टात आला असून राज्यातील सर्व निबंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे सदरची भरती प्रक्रिया पूर्वपदावर यावी यासाठी संबंधीत कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधला तर वेळोवेळी निवेदन देण्यात आली. असे असताना. आपल्या कार्यालयाकडून सध्या मनुष्यबळाची आवश्यकता नाही.त्यामुळे जेव्हा आवश्यकता भासेल त्यावेळेस तुम्हाला बोलावण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु विभागाला मनुष्यबळाची गरज भासली आणि आपण कंपनीला करार देऊन रा.प.म विभाग बुलडाणा येथील नियमबाह्य कंत्राटी चालक याची नेमणुक करून त्यांना आगार स्तरावर नियुक्त्या देण्यात आल्या.पुन्हा लवकरच एसटी.मध्ये ५ हजार कंत्राटी चालकांची भरती तात्काळ होणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एका वृत्तवाहिन्यांवर बोलताना सांगितले. शिवाय समस्या बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की एसटी मध्ये निवृत्त कर्मचारयांची संख्या वाढली तर यां उमेदवाराचा विचार करण्यात येईल, असे शेखर चन्ने यांनी सांगितले. हा आमच्या सारख्या उमेदवारावर अन्याय आहे. सदरची भरती आणि कंत्राटी कर्मचारी नियुक्ती ताबडतोब बंद करावी, अंतिम वाहन चाचणी तात्काळ घेऊन आम्हाला कर्तव्यावर रुजू करण्यात यावे अश्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहे. निवेदनावर जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षण पूर्ण झालेले तसेच प्रशिक्षण बाकी असलेल्या उमेदवारांच्या स्वाक्षरी आहेत.

