पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांचे आदेश धाब्यावर बसविले!

editor 2 Min Read
2 Min Read

– पाटरस्त्यांची कामे झालीच नाही,  बाबू पालकमंत्र्यांनाही जुमेना!
चिखली (एकनाथ माळेकर) – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात खुद्द पालकमंत्र्यांनी पाटाचे काम पूर्ण करून, पाटाचे रस्ते करून द्या, असे आदेश पाटबंधारे खात्यासह संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. परंतु, अधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, त्यांना जुमानत नसल्याचे सिद्ध केले आहे. अद्यापही पाटाचे रस्ते झाले नसून रस्त्यांअभावी अनेक शेतकर्‍यांची पेरणी रखडलेली आहे.
सविस्तर असे, की बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा जनता दरबार सिंदखेडराजा मतदारसंघातील अंत्री खेडेकर येथे भरला असता, या जनता दरबारात सर्व खात्यांचे अधिकारी वर्ग हजर होता. या दरबारामध्ये विशेष पाटाचा विषय सर्व शेतकरी व उपस्थितांनी उचलून धरला असता, पालकमंत्री शिंगणे यांनी सर्व लोकांच्यासमोर संबंधित पाटाचे काम पूर्ण करून पाटाचे रस्ते करून द्या, असा आदेश संबंधित अधिकारीवर्गाला दिला होता. शेतकर्‍यांना पेरणीसाठी शेतात जावे लागते. परंतु सदर पाटाचे रस्ते खराब असल्यामुळे लोकांची शेती पेरणी वाचून राहिली आहे. अंत्री खेडेकर हे गाव पालकमंत्री राजेंद्र शिंगणे त्यांच्या मतदारसंघातील आहे. संबंधित अधिकार्‍याला फोन लावला असता, हे अधिकारी आम्ही ज्या एजन्सीला काम दिले आहे. त्यांना फोन लावून सांगतो-करतो, अशी उत्तरे देतात. संबंधित एजन्सीचा माणूस नुसता फोनवर येऊन, पाहतो, असं सांगतो. आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहे. रस्ता नसल्यामुळे शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. तेव्हा, पालकमंत्र्यांनी त्यांचे आदेश न पाळणारे अधिकारी तातडीने बडतर्फ करावेत, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.

Share This Article
Exit mobile version