जुनी पेन्शन, पदोन्नतीच्या मागणीसाठी ’कॉस्ट्राईब’चे बुलढाण्यात निदर्शने

editor 1 Min Read
1 Min Read

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी ‘कॉस्ट्राईब’ कर्मचारी महासंघाच्यावतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. बुलढाण्यातही जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

मागासवर्गीय कर्मचार्‍यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, मागासवर्गीय पदोन्नती व सरळ सेवेतील अनुशेष भरण्यात याव्या, कर्मचार्‍यांना जुनी पेंशन लागू करावी, ग्रामीण भागातील कर्मचार्‍यांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा आदी मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

आज शुक्रवारी आयोजित आंदोलन जिल्हाध्यक्ष सुभाष डोंगरदिवे, राज्य उपाध्यक्ष अविनाश वाकोडे, मुख्य सचिव बी. डी. धुरंधर, आय. टी. इंगळे, शेषराव वाकोडे, अशोक हिवाळे, जी एस वाघ, कैलास तेलंग, अशोक दाभाडे, प्रशांत बोर्डे, डी एस गवई, अरुण सावंग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

Share This Article
Exit mobile version