सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते या योजनेंतर्गत दक्षिण तालुक्यातील ८० किलोमीटरचे रस्ते तयार होणार असून यासाठी तब्बल २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून दक्षिणच्या सर्व गावामधील शिवारातील रस्ते जोडले जाणार असून यामुळे शेतकर्यांची मोठी अडचण दूर होणार असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत- पाणंद मंजूर रस्त्यांच्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित आढावा बैठकीत आमदार सुभाष देशमुख बोलत होते.
आमदार देशमुख पुढे म्हणाले की, शेती हा शेतकर्यांचा आत्मा आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शेत शिवार हे गावांना खर्या अर्थाने जोडले जाणार आहे. या योजनेतून रस्ते मजबूत नव्हे तर कामाचा समावेश करण्यात आला आह?. एका किलोमीटरसाठी तब्बल २५ लाख हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. दक्षिण तालुक्यातील सर्व २९ गावांमधून ८० किलोमीटरचे रस्ते या योजनेच्या माध्यमातून तयार होणार आहेत.
शासनस्तरावरून या योजनेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्याने या परिसरातील शेतकर्यांची रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या मिश्रणातून राबविण्यात येणार आहे. यासाठीचा निधी राज्य रोहयोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आह?. आहे. या योजनेतून दक्षिण मधील सर्व गावातून कमीत कमी दोन किलोमीटर ते जास्तीत जास्त सहा किलोमीटरचे रस्ते तयार होणार आहेत, असेही आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
या याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेलकदे, तहसीलदार अमोल कुंभार, राजशेखर लिंबारे ,माजी उपसभापती रामपा चीवडशेट्टी कार्यकारी अभियंता श्री खराडे सहाय्यक गटविकास अधिकारी शितल बुलबुले, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम महाजन, उप अभियंता जिल्हा परिषद रविशंकर बोधले आदी उपस्थित होते .प्रारंभी प्रास्ताविक गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी केले ज्या गावांमध्ये अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा वाघ यांनी घडवून आणली. आढावा बैठकीचे समारोप सहाय्यक गटविकास अधिकारी शितल बुलबुले यांनी केले. आढावा बैठक यशस्वीेसाठी साह्य प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, राजशेखर कमले,विक्रम शहा, विशाल कुंभार, कैलास जिनदे, बाळासाहेब मम्हाने, विशाल मालतुमकर आदींनी परिश्रम घेतले.

