हिंदू राष्ट्र सेनेची बुलढाणा जिल्हा कार्यकारणी जाहीर

editor 1 Min Read
1 Min Read

चिखली (प्रतिनिधी) – चिखली येथे हिंदूराष्ट्र सेनेची बैठक होऊन गुरुवर्य हिंदू तेजसूर्य धनंजय भाई देसाई यांच्या आदेशाने भागवत एकादशी पवित्र तिथी पर्व साधून हिंदू राष्ट्र सेनेच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आल्या असून, नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हा कोषाध्यक्षपदी राकेश चोपडा तर बुलढाणा जिल्हा प्रसिद्ध प्रमुखपदी पत्रकार अनिल मंजुळकर यांची निवड करण्यात आली आहे.

चिखली येथील गुरुद्वार या ठिकाणी जिल्हा कार्यकारणी ची बैठक घेण्यात आली. हिंदूराष्ट्र सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय मारोतराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भगवान सुरजशे, राजू शिंगणे, जिल्हा संघटक जयदीप मिस्त्री, जिल्हा सहसंघटक दीपक निळकंठ गुळवे चिखली, जिल्हा सचिव जितेंद्र विनायक रनाळकर, जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र चोपडा चिखली, जिल्हा युवा उपाध्यक्ष सागर शामलाल बेंडवाल, जिल्हा महिला अध्यक्ष स्मिता महेश चिकिटकर, रणरागिनी जिल्हा अध्यक्ष ज्योत्स्ना अशोक नागरे बुलढाणा, आध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष गजानन शास्त्री ठेंग, जिल्हा संत संपर्कप्रमुख दत्तात्रय पुंडलिक मावळ, जिल्हा विधी प्रमुख एडवोकेट विनोद नरवाडे मेहकर, संपर्कप्रमुख डॉक्टर आनंद नामदेव रिंढे, मठ मंदिर संपर्क प्रमुख मिलिंद चिंचोळकर बुलढाणा, मठ प्रमुख दिलीप दत्तात्रय काकडे पेनटाकळी, जिल्हाआखाडा प्रमुख रोशन भालचंद्र पाठक, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पत्रकार अनिल बापूराव मंजुळकर, जिल्हा सत्संग प्रमुख विठ्ठल महाराज साठे, जिल्हा बौद्धिक प्रमुख किरण महाराज शिंदे, जिल्हा गो-रक्षा उपाध्यक्ष गोपाल शिराळे यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या बैठकीला जिल्ह्यातील हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

Share This Article
Exit mobile version