वर्ध्याचा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे याला २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

editor 3 Min Read
3 Min Read

वर्धा (प्रकाश कथले) – जिल्हा पुरवठा अधिकारीr विजय सहारे (वय ५०) याला विश्रामगृहातील त्याच्या खोलीतच रेशन दुकानदाराकडून २० हजारांची लाच स्वीकारताना नागपूरच्या भ्रष्टाचार व लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस चमूने अटक केली. विजय सहारे हा विश्रामगृहात रूम घेऊन राहात होता. त्याच्या खोलीत विविध लिफाफ्यात ठेवलेली ५ लाख ६० हजार ३६० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम त्याला लिफाफ्यातून कोणी दिली होती, हाही कळीचाच मुद्दा आहे. विजय सहारे याने विश्रामगृहालाच लाचखोरीचा अड्डा केला होता, ही बाबही समोर आली आहे.

पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तसेच त्याचा मध्यस्थ ऋषिकेष रमेशराव ढोडरे (वय ४३), याला अटक केली आहे. विजय सहारे हा रामटेकच्या डॉ. आंबेडकर वॉर्डातील रहिवासी आहे. तर त्याचा मध्यस्थ वर्ध्याच्या केशवसिटीत राहातो. विजय सहारे हा वर्ध्यात बदलून आल्यानंतर विश्रामगृहात खोली घेऊन राहायचा. त्याच्या भ्रष्टाचाराचे अनेक किस्से बाहेर येत होते. भ्रष्टाचार व लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी त्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने यावर अखेर शिक्कामोर्तब झाले.

यातील तक्रारदार देवळीतील रहिवासी असून, तो स्वस्त धान्य दुकानाचा संचालक आहे. तक्रारदाराचे रेशन दुकान असून, तक्रारदारस रेशन दुकानाकरीता शासनाच्यावतीने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंंतर्गत कायदेशीर कमिशन मिळते. ते कमिशन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे याने काढल्याने त्याचे २५ हजार रुपये तसेच तक्रारदाराच्या २ रेशन दुकानाचा ७ महिन्यांचा २५ हजारांचा हप्ता, अशा एकूण ५० हजार रुपयांची जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे याने मागणी केली होती. तडजोडी अंती ४० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली असता यातील दुसरा आरोपी ऋषिकेश ढोडरे याच्या मार्फत विजय सहारे याने लाचेच्या पहिल्या हप्त्याची २० हजारांची रक्कम स्वीकारली. यात जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तसेच त्याचा साथीदार ऋषिकेश ढोडरे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

भ्रष्टाचार व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी या कारवाई दरम्यानच जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे राहात असलेल्या विश्रामगृहातील त्याच्या खोलीची पाहणी केली असता त्याच्या खोलीत विविध लिफाप्यात ठेवलेली ५ लाख ६० हजार ३६० रुपयांची रक्कमही मिळाली. ुभ्रष्टाचार व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते, यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी अनामिका मिर्झापुरे, पोलिस निरीक्षक प्रवीण लाकडे, नायक पोलिस शिपाई सारंग बालपांडे, महिला पोलिस शिपाई गिता चौधरी, अस्मिता मेश्राम, आशू श्रीरामे, करुणा सहारे, चालक नायक पोलिस शिपाई विकास गंडेवार यांनी केली.

Share This Article
Exit mobile version