हवाईदलात कार्यरत असणाऱ्या जवानाला कर्तव्यावर असताना आले वीरमरण

editor 1 Min Read
1 Min Read

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी)भारतीय हवाईदलात कार्यरत असणा-या बुलडाणा जिल्ह्यातील राहुल दत्तात्रय इंगळे जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे. २१ जून च्या रात्री नवी दिल्ली येथे ही घटना घडली आहे.
        चिखली तालुक्यातील भालगाव राहुल दत्तात्रय इंगळे (वय २४) हा दीड वर्षापूर्वी राहुल हवाईदलात भरती झाला होता. अतिशय खडतर आर्थिक परिस्थिती असताना दुकानात काम करून तर कधी मजुरी करून त्याने शिक्षण घेतले होते. महिनाभरापूर्वी सुट्टी आटोपून तो कर्तव्यावर दिल्लीला गेला होता. उद्या त्याचे पार्थिवच गावात येणार आहे. राहुलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. राहुलच्या पश्यात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्यूमुळे गावासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे. फेसबुक प्रोफाईल वर भारतमातेचा फोटो राहुलने लहानपणापासूनच सैन्यात जाण्याचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी प्रचंड शारीरिक मेहनत त्याने घेतली होती. व्यायाम हा त्याचा आवडीचा छंद होता. धावण्याच्या स्पर्धेतही त्याने अनेकदा तालुका, जिल्हा पातळीवर क्रमांक पटकावला होता. भारत मातेची सेवा हेच त्याचे जिवनध्येय होता. आजही त्याच्या फेसबुक प्रोफाईल वर भारतमातेचा फोटो आहे हे विशेष..!

राहुल ज्या युनिट मध्ये काम करतो त्या अधिका-यांनी राहुलच्या नातेवाईकांना दिल्ली येथे बोलवून घेतले आहे भालगाव येथील दोघेजण २२ जून रोजी औरंगाबाद येथून विमानाने दिल्लीला पोहोचले आहेत.

Share This Article
Exit mobile version