बुलढाणा (प्रशांत खंडारे) – हल्लीच्या जमान्यात ज्येष्ठांची काळजी घेतली जात नाही, अशी ओरड आहे. कौटुंबिक मूल्यांवर भारतीय परंपरा आधारलेली असून, त्याचे महत्त्व नवीन पिढीला पटवून देण्यासाठी व ज्येष्ठांची अडचण सोडविणार्या हेल्पलाइनचा जागर होण्यासाठी अनोख्या पद्धतीने ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यात आलाय. ज्येष्ठांची काळजी घेऊ, असे म्हणत गुलाबाचे फुल देऊन ज्येष्ठांमध्ये नवचेतना निर्माण करण्यात आली.
याबाबतची जनजागृती व्हावी यासाठी जनसेवा फौंडेशन पुणे, कृषीसमृद्धी मल्टीपर्पज फौंडेशन बुलडाणा, व राजर्षी शाहू महाराज शिक्षण क्रीडा ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था बुलडाणाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसोबत व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात आला. यासाठी महेंद्र सोभागे, मीनाक्षी कोळी, सतीश उबाळे, मंगेश उमाळे यांनी शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प देवून त्यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ बाबत माहिती देण्यात आली. व्हेलेंटाईन डे ला गुलाब फुल मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्यावर विशेष प्रकारचा आनंद दिसून आला.

