शिवसेना फुटली?

editor 3 Min Read
3 Min Read

– संघर्षासाठी तयार रहा, शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदारांना कानमंत्र

शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल आमदार : अजय चौधरी, रविंद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, उदय सामंत, सुनील राऊत, सुनील प्रभू, दिलीप लांडे, राहुल पाटील, रमेश कोरगावकर, प्रकाश फतरपेरकर आणि आदित्य ठाकरे

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अखेर उभी फुटली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू व स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसत, त्यांना जोरदार राजकीय धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला फक्त १२ निष्ठावान शिवसैनिक आमदार हजर राहिले आहेत. त्यावरून शिवसेना उभी फुटली असल्याचे दिसून आले. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळविण्याची आता फक्सात आैपचारिकताच बाकी आहे.  ‘शिंदेशाही’च्या कंपुत आतापर्यंत 49 आमदार सहभागी झाले असून, त्यात 42 शिवसेना आमदारांचा समावेश आहे. अतिशय अतितटीची बनलेली राजकीय परिस्थिती पाहाता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आमदारांची बैठक घेत, संघर्षासाठी तयार रहा, असा कानमंत्र दिला आहे. महाराष्ट्रावर आलेले हे राजकीय संकट निवारण्याचे शेवटचे प्रयत्न आता पवार करणार आहेत.
काल रात्रीच वर्षा बंगला सोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथेच आज पुन्हा शिवसेना आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला अजय चौधरी, रविंद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, उदय सामंत, सुनील राऊत, सुनील प्रभू, दिलीप लांडे, राहुल पाटील, रमेश कारगावकर, प्रकाश फतरपेरकर यांच्यासह मंत्री आदित्य ठाकरे असे एकूण १३ आमदार उपस्थित होते. त्यामुळे उर्वरित आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे की कसे, याची चाचपणी आता ठाकरे यांच्या राजकीय चाणक्यांकडून होत आहे.

दुसरीकडे, शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार संजय सिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, त्यांच्यावर ठाकरे यांनी कसा अन्याय केला, याचा पाढा वाचला आहे. हे पत्रच एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्हायरल केले आहे.
या सर्व घडामोडी पाहाता, शरद पवार यांनीदेखील आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना, शरद पवार म्हणाले, की टआम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कठोर पाऊले उचलण्यास सांगितले आहे. या सर्व परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत राहणार आहे. आणि, आम्ही सत्ता गमावली तरी आम्ही तुमच्यासोबत पुढील राजकीय संघर्षातही सोबत राहू. पक्षाच्या नेते व आमदारांनीही आता संघर्षासाठी तयार रहावे,ट असे पवार यांनी सांगितले.

Share This Article
Exit mobile version