राष्ट्रीय महामार्ग सहावर भीषण अपघात, चौघे ठार, तिघे गंभीर जखमी

editor 1 Min Read
1 Min Read

मलकापूर (तालुका प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर अपघातांची मालिका सुरूच असून, हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. तांदुळवाडी येथील पुलावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन जण गंभीर जखमी झालेत. या अपघातामुळे दुपारपर्यंत या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मृतदेह बाहेर काढून नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ वर तांदुळवाडी पुलावर विटांनी भरलेला एक ट्रक जात होता. यावेळी समोरुन येणार्‍या दुसर्‍या ट्रकची या ट्रकला जोरात धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, ४ जणांचा यामध्ये मृत्यू झाला. तर या अपघातात तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात. जखमींना मलकापूर येथे कुटीर रुग्णालय हलविण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या भीषण अपघातात विटांनी भरलेल्या ट्रकचा पुढील भाग चिरडला गेला. ट्रकला समोरून जोरात धडक बसल्याने समोरील काचा फुटल्या तसेच ट्रक वाहन चालकाचा यात जागीच मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
——————–

Share This Article
Exit mobile version